प्रा.स्वामिनाथ कलशेट्टी यांनी मांडला फुलेंचा इतिहास
बक्षीहीप्परगे ता.द.सोलापुर येथे क्रांतिसुर्य महात्मा फुले यांची 196 व्या जयंतीचे औचित्य साधुन व्याख्यान आयोजित करन्यात आले होते. या व्याख्यानमालेत प्रा.स्वामिनाथ कलशेट्टी यांनी महात्मा फुले यांचा सामाजीक शैक्षणीक शेतकरी विषयक कार्यांला उजाळा दिला.
यावेळी सर्व महीलांच्या हस्ते प्रतिमापुजन करन्यात आले. अनुराधा माळी,भाग्यश्री जाधव,नंदा काताळै,छबुबाई माळी, निर्मला माने,सुरेखा माळी,मिनाताई माने,यांचे हस्ते पुजन करुन कार्यक्रमाची सुरवात करन्यात आली. तसेच माजी सरंपच सिताराम राठोड,अंकुश माने,गोपाळ माळी,शंकरराव यादव,प्रा.संजय जाधव,उपसरपंच मनोज महाडीक, बाबासाहेब माने,गणेश शिंदे,गणेश निकम,उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा कलशेट्टी यांनी महात्मा फुले यांनी विदयेविना मती,निती,गती,वित्त कसे गेले म्हणुनच शिक्षण हे खुपच महत्वाचे आहे. ग्रामिण भागातील विदयार्थ्यानी उच्च शिक्षण घेऊन समाजाची गावाची सेवा करावी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनाही समाजात त्रास सहन करावा लागला पण त्यांनी चांगले कार्य करन्याचे सोडले नाही शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणुनच महात्मा फुले यांनी शेतकरयांचा आसुड या ग्रथांतुन त्यांनी शेतकरयांची व्यथा मांडली स्रिशिक्षण.आजच्या काळाची गरज आहे. मुलींनी शिक्षण घेतल्यास दोन घरांची प्रगती होते म्हणूंन ग्रामिण भागातील पालकांनी मुंलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावा असे मत मांडले.
या प्रसंगी प्रा.संजय जाधव,शंकरराव यादव,मनोज महाडीक यांनी ही महात्मा फुले यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ माळी यांनी केले तर सुत्रसंचलन अमोल जाधव यांनी केले तर आभार अंकुश माने यांनी मानले.