Ticker

6/recent/ticker-posts

दुरुस्तीच्या नावाखाली डांबर शिंपडलं खड्यात,अपघाताचा धोका नवरानवरीच्या ओढ्यात

सोलापूर : दि.१२ (धामणगाव प्रतिनिधी) पंतप्रधान सडक योजनेतून तीन वर्षापूर्वी तयार झालेला धामणगाव-वैराग रस्त्या कमालीचा खराब झाल्याने त्याची नवी-नवलाई संपली आहे. अनेक ठिकाणी रस्ता आरला गेल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते तर रस्त्यावर मोठाले खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.या रस्त्यादरम्यान नवरा नवरीचा ओढा आढळतो.

कधीकाळी बैलगाडीतून नवरा-नवरी प्रवास करत असताना - बैलगाडी उलटली व त्यात उभयतांचा मृत्यू झाला तेव्हापासून हा ओढा नवरा नवरीचा ओढा म्हणून ओळखला जातो. तिथे रस्ता खराब झाल्याने दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे.




बार्शी तालुक्यातील या अरुंद रस्त्यावर - तीव्र वळणे तसेच कोल्हापूर पध्दतीचा अरुंद पूल नागझरी नदीवर आहे. या समस्येत भर म्हणून अनेक ठिकाणी मोठाले खड्डे अस्तित्वात आहेत. पंधरवाड्यापूर्वी दुरुस्तीचे सोपस्कार पार पडले मात्र खड्ड्यात खडी न टाकता नुसतेच डांबर शिंपडले. अशाप्रकारे डांबराची धार खड्ड्यात ओतून रस्ता कसाकाय दुरुस्त होइल ? हा प्रश्न वाटसरुंच्या मनात निर्माण झाला आहे.प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन खड्डे व्यवस्थित बुजवावेत अशी मागणी होत आहे.

चौकट- खाजगी नेटवर्किंग कंपनीकडून केबल टाकण्यासाठी साईडपट्टी खणली गेलीय त्यामुळेही रस्ता खचत आहे. खड्डयासोबत साईडपट्टी दुरुस्ती आवश्यक आहे- किसन मसाळ,धामणगाव.