आदर्श शिक्षिका कवयित्री साहित्यीक सामाजिक बांधिलकी जपणारी कोठेकर योगिता संजय यांना साहित्य क्षेत्रातील साहित्य काव्य गौरव पुरस्कार जाहीर
“न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेच्या वतीने कोठेकर योगिता संजय शिवभूमी विद्यालय यमुनानगर निगडी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने साहित्य,कला,क्रीडा, सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२३ डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने ‘साहित्य काव्य गौरव पुरस्कार” दि. १३ एप्रिल २०२३ रोजी महाळुंगे इंगळे, ता.खेड,जि पुणे येथे जाहीर झाला आहे.
आगामी काळात सामाजिक विषयावर कविता सादर करून कवी रसिकांची मने जिंकली,या आंनददायी अध्यापन करतांना त्यांनी गेले दहा वर्षाच्या काळात कवितेचा यशस्वी प्रवास करत साहित्य क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे,अनेक राजस्तरीय काव्यसंमेलनात सहभाग घेऊन साहित्य क्षेत्रातील उपक्रम आणि पुरस्कार त्यांनी मिळविले आहेत शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी या विचारातून अनेक गरजवंत विध्यार्थाना शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे, सामाजिक जागृतीचे संदेश सर्व महाराष्ट्रभर पसरविण्याचे अतिशय मोलाचे त्यांनी काम केले आहे.