Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा व महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण कायदा ताबडतोब पारित करावा : बार कौन्सिलच्या शिष्टमंडळाचा उपमुख्यमंत्र्यांना मसुदा सादर


सोलापूर : दि.१० (प्रतिनिधी)  वकिलांवरील वाढते हल्ल्यांवर वचक बसवणेकामी ताबडतोब महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्र अधिवक्ता कल्याण कायदा ही नव्याने अमलात आणावा याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड.गोवाचे शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही कायद्याचे मसुदे वाचून त्यातील मुद्दे समजून घेतले व हे दोन्ही कायदे पारित करणेकमी योग्य ती  सकारात्मक चर्चा केली.
        

या शिष्टमंडळात बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड.मिलिंद पाटील, माजी अध्यक्ष ऍड.मिलिंद थोबडे,उपाध्यक्ष ऍड.संग्राम देसाई, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ऍड.जयंत जायभावे, ऍड.परिजात पांडे,ऍड.विवेक घाडगे,ऍड.सुभाष घाडगे, ऍड.गजानन चव्हाण,ऍड.सतीश देशमुख,ऍड.उदय वारंजीकर, ऍड.अविनाश भिडे,ऍड.विठ्ठल कोंडे-देशमुख,ऍड.संदीप केकान आदी उपस्थित होते.