राज्यात जिल्हा पोलीस प्रमुखाच्या घर सुरक्षित नाही? ही खरी चोरी आहे की आणखी काही? चोरी इतके धाडस करेल का? नक्की चंदन चोरीचा घोळ आहे तरी काय? आता एसपी च्या शासकीय घरातील चंदन देखील चोरीला चाललंय? कुंपणच शेत खात नाही ना?
सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या विकास नगर मधील निलगिरी बंगलोमधील चंदनची तीन झाडे अज्ञात चोराने चोरी करून नेली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत शिंदे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत शिंदे हे शुक्रवारी - सकाळी निलगिरी बंगल्याच्या पाठीमागील लाईटचे बटन बंद करण्यासाठी गेले होते. तेव्हा लाॅनमध्ये असलेले एक मोठे चंदनाचे झाड कापलेले त्यांना दिसले. तेथे जाऊन पाहणी केली असता, चंदनाचे झाड तोडल्याचे व त्याचा बुंधा नसल्याचे त्यांना दिसले.
यामुळे फिर्यादी व त्यांचे सहकारी - चंदनशिवे संदीप हुलगे यांनी बंगल्यातील चंदनाच्या झाडांची पाहणी केली असता गेस्ट हाऊसच्या बाजूचे झाड व पाण्याच्या टाकीजवळील चंदनाचे झाड तुटलेले दिसले. त्याचाही बुंधा नसल्याचे आढळले. यामुळे निलगिरी बंगलोमधील तीन चंदनाचे झाड तोडून त्याचा बुंधा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत शिंदे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोसई गायकवाड करत आहे.