सोलापूर : दि.०२ (प्रतिनिधी) कुमठे कनिष्ठ महाविद्यालय व ब्रह्म स्पोर्ट्स क्लब च्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.संजय जाधव, प्रमुख वक्ते प्रा.दीपक शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दादाराव डांगे, विक्रम पवार, ईश्वरकट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा.संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ब्रह्म स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक विक्रम पवार यांनी केले. प्रा.दीपक शिंदे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन प्रवासाविषय मार्गदर्शन केले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळ आत्मसात करून भारताचे प्रतिनिधित्व केले व भारतात ऑलिंपिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून दिले असे सांगितले. प्रा.डांगे यांनी विद्यार्थिनी विविध खेळात भाग घेऊन देशाचे नाव लौकिक करावे असे म्हटले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.संजय जाधव म्हणाले खेळामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ होते. तसेच खेळात सातत्यपूर्ण सराव महत्वपूर्ण असून त्यामुळेच आपले ध्येय गाठता येते. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ईश्वरकट्टी यांनी केले.