Ticker

6/recent/ticker-posts

आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे हिंदी विभागाच्या वतीने भित्तिपत्रिकेचे अनावरण

कडेगांव : दि.२१ (प्रितिनिधी) आर्ट्स ॲन्ड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे हिंदी विभा‌गाच्या वतीने हिंदी दिन सप्ताहानिमित्त आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या हिंदी साहित्यिक गीतांजली श्री या विषयावर आयोजित केलेल्या भितिपत्रिकेचे उद् घाटन प्रा.डॉ. विश्वनाथ सुतार यांच्या शुभहस्ते व हिंदी विभागप्रमुख प्रा.सौ.आशाराणी हावळे यांच्या अध्यक्षतेखाली व नॅक समन्वयक प्रा. दीलीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
                

प्रारंभी प्रा.सूरज डुरेपाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून हिंदी दिन सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन भित्तिपत्रिका आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.  प्रमुख उपस्थितांचे स्वागत प्रा.सूरज डुरेपाटील व प्रा.सौ. वैशाली मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
         
यावेळी उ‌द् घाटनपर भाषणात बोलताना प्रा.डॉ. विश्वनाथ सुतार म्हणाले की,हिंदी साहित्यिक गीतांजली यांच्या 'रेत समाधि' या कादंबरीला आंतर राष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. गीतांजली या बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या हिंदी साहित्यिक आहेत,असे सांगून प्रा.डॉ.विश्वनाथ सुतार पुढे म्हणाले की,बुकर पुरस्काराच्या रुपाने गीतांजली ने हिंदी भाषेला जागतिक मानसन्मान मिळवून दिला. त्यांनी आपल्या साहित्यातून स्त्रीयांचे मन व समाज मन रेखाटले असून त्यांची भाषा हृदयाला स्पर्श करणारी आहे. अशा स्वरूपाच्या भित्तिपत्रिकेमुळे विद्यार्थाच्या सर्जनशितेला व नवनिर्मितीला प्रेरणा मिळते असेही ते शेवटी म्हणाले. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन घाडगे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा.सौ.वैशाली मोहिते यांनी केले. या भित्तिपत्रिका कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य बापूराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. सूरज डुरेपाटील, किरण भोगाळे,सचिन माने यांनी केले.