Ticker

6/recent/ticker-posts

एमआयएमचे रस्त्यासाठी आंदोलन;पण हा रस्ता एमआयएमच्या नगरसेवकांनी केलं होतं


सोलापूर : दि.१२ (प्रतिनिधी) एमआयएमच्या नगरसेवकांनी केलेल्या रस्त्याविरोधात एमआयएमच्या महिला पदाधिकर्यांनी व कार्यकर्त्यांनी सोलापूर महानगरपालिके समोर धरणे आंदोलन केले आहे.ज्या रस्त्याची एमआयएमने मागणी केली आहे,त्या प्रभागात चारही नगरसेवक एमआयएमचे आहेत.आंदोलन करणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांना ही बाबमाहिती नव्हती का असा सवाल निर्माण झाला होता.एमआयएमच्या नगरसेवकानेच हा रस्ता केला होता आणि आज सोमवारी 12 सप्टेंबर रोजी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिके समोर आंदोलन केले.



महिला आघाडीच्या नेत्यांनी केला विरोध- एमआयएमच्या महिला आघाडीच्या नेत्या रेश्मा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिके समोर झाले.शहरातील आसरा चौक ते अमन चौक येथे या दरम्यान असलेला मुख्य रस्ता करा अशी मागणी मनपा आयुक्त यांकडे केली.यांसोबत एमआयएममध्ये नुकतेच प्रवेश केलेले शोएब चौधरी ,इसामोद्दीन पिरजादे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.धरणे आंदोलना वेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरोधात घोषणाबाजी केली.पण हा रस्ता एमआयएमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या प्रभागातील आहे.हे आंदोलकांना कळून चुकलं आहे.

एमआयएम विरोधात एमआयएम असे चित्र- सोलापूर महानगरपालिका 2017 च्या निवडणुकीत प्रभाग 21 मध्ये एमआयएमचा पूर्ण पॅनल निवडून आला होता.आसरा चौक ते अमन चौक हा रस्ता प्रभाग 21 मध्ये आहे.तसेच एमआयएमच प्रभाग 14 मधील नगरसेवक व एमआयएमचे गटनेता रियाज खरादी यांनी देखील आपल्या भांडवली निधी मधून हा रस्ता केला होता.तसेच या प्रभागात तौफीक शेख,तस्लिमा शेख,वाहिदा शेख,अजहर हुंडेकरी हे नगरसेवक आहेत.या नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.मात्र पाच वर्षे या नगरसेवकांनी एमआयएममधून काम केले.एमआयएमने केलेला रस्ता आणखीन आधुनिक करा,मुख्य लोकवस्तीला जोडणारा रस्ता आहे अशी मागणी करत महानगरपालिके समोर आंदोलन करण्यात आले.एमआयएम विरोधात एमआयएम असे चित्र  सोलापूर महानगरपालिके समोर दिसून आले.