अक्कलकोट : दि.२२ (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्याचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दशसूत्री उपक्रम प्रभावीपणे शाळा स्तरावर राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन अक्कलकोट बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी हरिशचंद्र गायकवाड यांनी केले. तालुक्यातील नागणसुर येथील कन्नड मुलामुलींचे शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता तपासून शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी - केंद्रप्रमुख गुरुनाथ नरुणे होते.व्यासपीठावर केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव,कन्नड मुली शाळेचे मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे ,कल्लय्या गणाचारी, शांता तोळणूरे उपस्थित होते.
अक्कलकोट बिटचे नूतन बिट विस्ताराधिकारी - हरिचंद्र गायकवाड यांनी नागणसुर येथील कन्नड मुलां-मुलींची शाळेला भेट देऊन प्रत्येक वर्गात जाऊन विध्यार्थी गुणवत्ता तपासून शालेय परिसर,विध्यार्थी गुणवत्ता,शालेय पोषण आहार किचन शेड,बाग बगीचा,वर्गखोली पाहून समाधान व्यक्त केले.शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या मुख्याध्यापक,सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे कौतुक केले.विध्यार्थी गुणवत्ता पाहून रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांच्या गौरव केले. दशसूत्री उपक्रमाचे विविध उपक्रम चालू असल्याबाबत समाधान व्यक्त करून दशसूत्री उपक्रम अजून प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले. शैक्षणिक कार्यासाठी सर्वाना शुभेच्छा दिले.
या वेळी शाळेतील - विषय शिक्षक शरणप्पा फुलारी यांनी प्रस्तावना करून शाळेतील स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन,विविध खेळ,गायन,वादन, नृत्य,नाट्य,लेझीम,टिपरी,गणेशोत्सव, प्रवेशोत्सव ,सायकल बँक आदी उपक्रमाचे यशस्वीपणे राबवत असलेलं उपक्रम विषयी माहिती दिले.नूतन शिक्षण विस्तार अधिकारी पदी पदोन्नती मिळाल्याने गायकवाड साहेब यांच्या दोन्ही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले.
या वेळी शाळेचे - मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे,विद्याधर गुरव, विषय शिक्षक शरणप्पा फुलारी, लक्ष्मीकांत तळवार,लक्ष्मीबाई देगांव,सहाशिक्षक शांता तोळणूरे,जिंनेदभाषा नदाफ,बसय्या स्वामी,विजयश्री एंटमन, शिवशरण म्हेत्रे,खाजप्पा किणगी,चन्नम्मा बिराजदार,सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
फोटो ओळ - नागमसुर कन्नड मुलामुलींचे शाळेत शिक्षणविस्तार अधिकारी हरिशचंद्र गायकवाड भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुणवत्ता तपासून मार्गदर्शन करताना..
