Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत किर्तीवंत पाल्य घडवा - प्रा.स्वामींनाथ कलशेट्टी

सोलापूर : दि.२१ (प्रतिनिधी) पालक सभा म्हणजे विद्यार्थ्यांचा वैयक्तिक पातळीवर विकास करण्यासाठी पालक व शिक्षक या दोघांचा संवाद होय. आपला पाल्य कॉलेजमध्ये जातो. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडविण्यासाठी शिक्षकासोबत पालकांची ही जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या मुला मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुलेही आपली संपत्ती आहे. संस्कारक्षम, गुणवंत व किर्तीवंत मुले घडविणे हे काळाची गरज आहे. असे मत प्रा.कलशेट्टी यांनी व्यक्त केले. 
          
कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात - विद्यार्थी पालक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे अध्यक्ष संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने हे होते. प्रमुख मार्गदर्शक प्रा.कलशेट्टी हे होते. प्रमुख उपस्थिती प्राचार्य जयसिंग गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश काशीद व प्रा. संजय जाधव उपस्थित होते.
          

यावेळी अध्यक्ष  मनोगतामध्ये - आपले मत मांडताना श्री जयकुमार माने यांनी स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांनी उभे केलेल्या या संकुलातून गोरगरिबांची मुले शिक्षण घेऊन आपल्या गावचे नाव उज्वल करून संस्थेचाही नावलौकिक करावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये  पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत सर्व विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. वाणिज्य संघटन या विषयांमध्ये बोर्डात शंभर पैकी 96 गुण घेऊन कुमारी श्रुती सिद्धाराम कांबळे इतिहास या विषयात शंभर पैकी 93 गुण घेऊन कुमारी अरिफा राजेबाई शेख तर अकाउंट या विषयांमध्ये शंभर पैकी 93 गुण घेऊन यास्मिन मुल्ला या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
 
या कार्यक्रमाचे आयोजन - प्रा.दीपक शिंदे प्रा.विजयकुमार वाळके प्रा.विनोद थोरात प्रा.राजीव निकम प्रा.बंडोपंत बाबर यांनी केले होते तर या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा दादाराव डांगे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.हणमंत शिंदे यांनी मांडले