Ticker

6/recent/ticker-posts

रविवारी सोलापूरात राज्यव्यापी मराठा आरक्षण परिषदेच आयोजन.


सोलापूर : दि.१७ (प्रतिनिधी) मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने झाली आणि दोन वेळा समाजाला आरक्षण देण्यात आलं.  घटनाबाह्य आरक्षणामुळे ते चिरकाल टिकले नाही. या मुळे समाजाच नुकसान झाले. 

मराठा समाजाच लोकसंख्येच्या - तुलनेत उच्च शिक्षण, न्याय पालिका, प्रशासन व्यवस्था, उच्च व्यावसायिक यात अल्प प्रमाणात आहे. तसेच धार्मिक, आर्थिक , रुढी परंपरा यात ही मागास आहे. असा अहवाल या पुर्वी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने सरकारला सादर केले आहे. आरक्षणाच्या निकषात बसणाऱ्या समाजाला केवळ शाश्वत आरक्षण न मिळाल्याने समाजातील मागास घटक अजूनही मागास राहिला आहे. मराठा समाजातील या घटकाला समाज प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे.  आणि हे घटनात्मक आरक्षण हे ५०% च्या आतील मिळणार आहे आणि मराठा समाज यास प्रात्र आहे.  या आरक्षणाचा मराठा समाजाला कसा लाभ होईल हे या परिषदेत बाळासाहेब सराटे, ॲड अभिजीत पाटील, मा. शिवानंद भानूसे, ॲड सुरेश गायकवाड या अभ्यासांकडून मांडण्यात येणार आहे. 

रविवार दि १८ सप्टेंबर रोजी - छत्रपती शिवाजी प्रशालेच्या राजर्षी शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता या परिषदेच आयोजन करण्यात आले आहे. या राज्यव्यापी परिषदेस मा उच्च न्यायालय व मा सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे याचिकाकर्ते, शहरजिल्हासह राज्य स्तरावरील समन्वयक आणि समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. तरी समाज बांधवांनी उपस्थित रहावे. अशी माहिती संयोजक रवि  मोहिते यांनी दिले आहे. यावेळी राम गायकवाड, राम साठे, उदय पाटील, मनिष सुर्यवंशी, प्रकाश ननावरे, विकास कदम, कृष्णा पवार, पोपट भोसले, विकी बाबा सुर्यवंशी, निखिल भोसले, किरण पवार, निर्मला शेळवणे, मनिषा नलावडे, सुनंदा साळुंखे, वृषा गायकवाड आदी उपस्थित होते