सोलापूर : दि.१४ (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियांन (नागरी) २.० चे वर्ष पूर्तता तसेच स्वच्छ भारत अभियांनाची ८ वर्ष पूर्ण झाली आहे. या अनुषंगाने गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालया मार्फत दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यास अनुषंगाने विविध उपक्रम सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महानगरपालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली या बैठकी मध्ये उपायुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, उपशिक्षणाधिकारी सुधा साळुखे,प्रशासनाधिकारी संजय जावीर तसेच सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य हे बैठीस उपस्थित होते.
या बैठीक मध्ये “स्वच्छ अमृत महोत्सव” अंतर्गत “इंडियन स्वच्छता लिग” मध्ये सोलापूर महानगरपालिकेनेही सहभाग नोंदविला आहे. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेने “सोलापूर स्वच्छता सुपरस्टार” या नावाने या नावाने केंद्र शासनाकडे टीम रजिस्टर केलेली आहे. सदर टिम मध्ये सोलापूर शहरातील जास्तीत जास्त युवा वर्गानी नागरिकांनी सहभागी होणे करिता पुढील https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवर रजिस्ट्रेशन करणे करिता मा.आयुक्त यांनी आवाहन केलेले आहे.
“स्वच्छ अमृत महोत्सव” अंतर्गत दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधी मध्ये सोलापूर शहर कचरा मुक्त करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आले. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवा वर्ग तसेच सर्व नागरिकांमध्ये जनजागृती होणे कामी महानगरपालिके च्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता शहरामध्ये विविध भागात महाविद्यालयीन विद्यार्थी यांची रॉली निघणार आहे. त्याचबरोबर या स्वच्छ अमृत महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता शहरातील विविध कॉलेजच्या मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. Segregation of Waste At Source या थीम वर आधारित ही स्पर्धा महापालिकेच्या वतीने घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 10,000 द्वितीय बक्षीस, 7500 तृतीय बक्षीस, 5000 व 10 उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार असून प्रत्येकी 1000 रुपये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एक मिनिटाचा व्हिडिओ त्याचबरोबर पेंटिंग पोस्टर तयार करणे तसेच दुसरी स्पर्धा क्रमांक1--fun and learn--Design and early prototype of toys from waste at home/workplace and surroundings स्पर्धा क्रमांक 2 -- use and enjoy--Design and models of games and play in the park/open spaces made from waste स्पर्धा क्रमांक 3 -- new from old --ideas /solutions/working models for durable design, reuse of components, for manufacturing of toys by industries
असे स्पर्धेचं स्वरूप आहे. ही स्पर्धा शहरातील नागरिकांसाठी व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्यागटामध्ये घेण्यात येणार आहे. वरील सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण कक्ष मो. 9921326077,8275304156 या नंबरवर संपर्क करावे असे आवाहन आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले.