Ticker

6/recent/ticker-posts

किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू - कॉ.नरसय्या आडम मास्तर

कॉ.मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

सोलापूर : दि.१८ (प्रतिनिधी) विडी कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे ही प्रमुख  मागणी घेऊन सरकारवर सातत्याने लढ्याच्या जोरावर दबाव टाकल्यामुळे 14 नोव्हेंबर 2014 साली महाराष्ट्र राज्य सरकारने विडी कामगारांना सुधारीत किमान वेतन जाहीर केले त्यानुसार दर हजारी विड्यास किमान वेतन व विशेष भत्यासह 288 रुपये निर्धारित करण्यात आले परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही याउलट आपल्या शेजारी राज्यात तेलंगाणा येथे  223/-  कर्नाटक येथे 282 /-   मजुरी दिली जाते आणि सोलापूरात 200 रुपये मजुरी दिली जाते. ही तफावत म्हणजे विडी कामगारांच्या मेहनातीची अन्यायकारक लूट आहे. विडी कामगारांना दर हजार विड्यास 312  हक्काची मजुरी मिळाले पाहिजे या मागणी करीता सरकारच्या विरोधात विडी कामगारांना मैदानात उतरावे लागेल.सरकारला जाब विचारण्यासाठी राजकीय शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत लढाऊ नगरसेवकांना कामगारांचे प्रतिनिधी पाठविल्यास किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू आणि श्रमिकांचा बंगला पंतप्रधान यांच्या हस्ते हस्तांतरण करू असा आशावाद ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

कॉ.मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ते बोलताना पुढे म्हणाले की, आजची  महागाई ही सर्वसामान्यांसोबत मध्यमवर्गीयांना  सुद्धा परवडणारी नाही.जीवनावश्यक वस्तूंचे दर सामान्य माणसांची घोर निराशा केली आहे.याला रोखथांब करण्यासाठी  एल्गार हाच पर्याय आहे.


गृहनिर्माण संस्थेच्या सर्व कामकाजावर प्रकाश टाकले.यावेळी म्हणाले की, अद्यापही काही लाभार्थी हक्काच्या घरासंबंधी उदासीन आहेत, अनेक तांत्रिक अडचणी सांगत आहेत अशांबाबत संस्था गांभीर्याने कायदेशीर पाऊल उचलणार आहे. व्यासपीठावर व्यंकटेश कोंगारी, सिध्दप्पा कलशेट्टी,कुरमय्या म्हेत्रे,रंगप्पा मरेड्डी, विजयालक्ष्मी महेशन आदि उपस्थित होते.  

सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन केले.या सभेची सुरुवात कॉ.मिनाक्षीताई साने यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रस्ताविक युसूफ शेख मेजर यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे जमा खर्च व लेखापरीक्षण अहवाल लेखापाल गजेंद्र दंडी यांनी मांडले व याला सभेने एकमताने मंजुरी दिली. 
 

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.याप्रसंगी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र पद्मा,दीपक निकंबे, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, पांडुरंग म्हेत्रे, अभिजीत निकंबे,नागेश म्हेत्रे, मोहन कोक्कुल,शिवानंद श्रीराम,अंबादास गडगी, मल्लिकार्जुन बेलियार, राम मरेड्डी,श्रीनिवास तंगडगी, अंबाजी दोंतुल,प्रवीण आडम,प्रकाश कुऱ्हाडकर,गोपाळ जकलेर, सिद्राम गडगी,संजय मरेड्डी,विजय मरेड्डी,युसूफ शेख,अनिल घोडके,अंबादास बिंगी, लक्ष्मण जोरीगल,शाम आडम,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी आणि प्रिया कोतलापुरे,  विद्या मंचाल, राहिसा शेख,  कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.