Ticker

6/recent/ticker-posts

श्रीगणेश विसर्जनासाठी महापालिकेचे नेटके नियोजन शहरात 12 ठिकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्था

              84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र

सोलापूर : दि.०७ (प्रतिनिधी)  शहरात श्री गणेश विसर्जन करण्यासाठी महापालिकेने विविध 12 ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्याचे नियोजन केले आहे तर विविध  84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी दिली.


सोलापूर शहरात शुक्रवारी श्री गणेश विसर्जन होणार आहे. त्यानिमित्ताने महापालिका आयुक्तांनी पर्यावरण पूरक मूर्तीचे शक्यतो घरच्या घरीच विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे. ज्यांना शक्य नाही अशांसाठी विविध 84 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र ठिकाणी सर्व नागरिकांनी मूर्ती संकलित करावे. तेथून महापालिकेच्या वतीने खाणीपर्यंत नेण्याची आणि विसर्जन करण्याची सोय करण्यात आली आहे. 
    
 विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. शहरात विविध 12 ठिकाणी कृत्रिम कुंड व्यवस्था करण्यात येत आहे. 84 ठिकाणी श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र व्यवस्था केली आहे वाहतुकीसाठी 70 गाड्या तैनात राहणार आहेत तसेच महापालिकेचे सहाशे कर्मचारी कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर मक्तेदाराकडून एका दिवसासाठी 400 कामगार उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत असे महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी सांगितले.


श्री गणेश विसर्जनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्वयंसेवकाची ही गरज भासणार आहे त्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याकरिता महापालिकेकडे पूर्व नोंदणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केले आहे.
  
तीन फुटावरील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन तुळजापूर रोडवरील खाणीत करण्याचे नियोजन आहे तरी विविध मंडळांनी यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले आहे.