महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी आपल्या घरात मोठ्या भक्ती भावाने पर्यवरण पूरक श्री.ची प्रतिष्ठापना केली.
सोलापूर : दि.३१ (प्रतिनिधी) विघ्नहर्ता बाप्पा गणेशाचे आगमनाचे औचित्य साधून आयुक्त पि. शिवशंकर यांनी आपल्या परिवारासह आपल्या निवासस्थानी मोठ्या भक्तिभावाने पर्यवरण पूरक श्री.ची घरगुती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली.बाप्पाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करताना आयुक्त पि.शिवशंकर यांनी श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व विघ्न, दुःखांचं निवारण व्हावं ; तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. सर्व सोलापूर शहरवासीयांना या गणेशोत्सवानिमित्त आयुक्त पि.शिवशंकर यांनी शुभेच्छा दिल्या.