सोलापूर : दि.१५ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा सोमवारी सर्वत्र मोठा उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथेही कासेगांव ग्रामपंचायत, कासेगांव पोलीस दूरक्षेत्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, कासेगांव शाखा यांच्यासह विविध ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत कासेगाव पोलीस दुरक्षेत्र येथे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हवेल जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव, पोलीस हवालदार मनोज भंडारी, पोलीस नाईक शिवाजी मोरे, पोलीस नाईक फिरोज मियावाले, सरपंच सौ. सुरेखा जनार्दन काळे, जनार्दन काळे,महात्मा गांधी तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, माजी अध्यक्ष राम चौगुले, अल्लाऊद्दीन शेख यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान कासेगांव येथे ' हर घर तिरंगा ' उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावला आहे. स्वातंत्र्यदिनी कासेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परंपरागत ठिकाणी महिबूब शाहवली दर्गाहजवळ सरपंच सौ. सुरेखा जनार्दन काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच शंकर वाडकर, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, नेताजी सुभाष चंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक दिलीपराव चौगुले, माजी सरपंच नेताजी पाटील, गांव कामगार तलाठी आरीफ हुडेवाले, माजी सैनिक इलाही तांबोळी, लक्ष्मण ढेकळे, सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य समाजसेवी संस्थाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कासेगांव येथील स्मृतिस्तंभांना पुष्पमाला अर्पित करुन ब्रिटीशकालीन सैनिक गुलाब शेख आणि १९९३ साली जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले कासेगांवचे वीरपुत्र शिवराम विश्वनाथ चौगुले यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा शिवराम चौगुले यांचे पुत्र प्रविण चौगुले, तलाठी हुडेवाले, उपसरपंच शंकर वाडकर, ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पाटील, राम हुडकर, रमजान मकानदार आणि खंडेराव गायकवाड उपस्थित होते.
