Ticker

6/recent/ticker-posts

चीनच्या राजदूताना प्रवासात त्रासाबद्दल सोलापूर विकास मंच यांनी व्यक्त केली दिलगिरी


सोलापूर : दि.३१ (प्रतिनिधी) डॉक्टर कोटणीस यांच्या स्मारकास भेट देण्यासाठी ३० ऑगस्ट मंगळवार रोजी चीन चे भारतातील राजदूत सन वैडेंग यांनी महान मानवतावादी व सोलापूरचे सुपुत्र डॉ द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास भेट दिली. यावेळी डॉ.कोटणीस यांच्या निधनानंतर दस्तुरखुद्द तेव्हाचे चीन चे सर्वेसर्वा माओ यांनी स्वहस्ताक्षरात श्रद्धांजली पत्र लिहिले होते. त्या ऐतिहासिक पत्राचे जतन करण्यासाठी एक काचेची पेटी चीन सरकारने दिली आहे. त्याच्या उद्घाटनास आज राजदुत सपत्नीक शिष्टमंडळासह हजर होते.

या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी चीनच्या राजदुतांना सपत्नीक दिल्ली ते पुणे विमान प्रवास करून पुण्याला लॅन्ड व्हावे लागले व पुण्याहून रस्ता मार्गे 5 तास प्रवास करून सोलापूरला यावे लागले.केवळ सोलापुरात विमानसेवा सुरू नसल्या मुळे त्यांना त्रास सोसावा लागल्याने प्रवासातील झालेल्या त्रासाबद्दल समस्त सोलापुरातील सामान्य नागरिकां तर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त केली व पुढील वेळी सोलापुरात याल तेव्हा सोलापुरातील विमानसेवा निश्चित सुरू झालेली असेल असे आश्र्वासन दिले.



या प्रसंगी सोलापूर विकास मंचाचे केतनभाई शहा,गणेश पेंनगोंडा,रमेश खुने,अनंत कुलकर्णी,विजय जाधव व योगिन गुर्जर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.