Ticker

6/recent/ticker-posts

नागणसुर कन्नड मुलींची शाळेत कारबोवॅक्स लसीकरण

अक्कलकोट : दि.०४ (प्रतिनिधी) अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील कन्नड- मराठी शाळेतील विध्यार्थ्यांना कोरोना लसीकरण अंतर्गत कारबोवॅक्स लसीकरण करण्यात आले.
  
नागणसुर कन्नड मुली,मुले आणि मराठी शाळेतील सहावी आणि सातवी वर्गात शिकणाऱ्या 12 ते 14 वर्षे वयोगटातील विध्यार्थ्यांना नागणसुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी  डॉ.बी.एन. पाटील व डॉ.वाघमारे यांच्या नेतृत्वात लसीकरण मोहीम राबविण्यात आले.एकूण 193 विध्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.या कामी बेबीनंदा शेळके आरोग्य सहायीका,शशिकांत सुलगडले आरोग्य सहायक, संजय राठोड आरोग्य सेवक,पद्मजा गोणे समुदाय अधिकारी,
चांगुणा चव्हाण आरोग्य सेविका, शोभा कोळी आशा,
सुरेखा होटकर आशा,विमल होटकर परिचर आदींनी परिश्रम घेतले. 

मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विद्याधर गुरव,मल्लप्पा कवठे,राजशेखर करपे,विषय शिक्षक पुंडलिक कलखांबकर,शरणप्पा फुलारी,शिवशरण म्हेत्रे,लक्ष्मीकांत तळवार समवेत शाळेतील शिक्षक बंधू-भगिनीचे सहकार लाभले.

फोटो ओळ :- नागणसुर कन्नड मुलींची शाळेत कन्नड मुले-मुली आणि मराठी शाळेतील विध्यार्थ्यांना कारबोवॅक्स लसीकरण करण्यात आले.या वेळी मुख्यध्यापक मल्लप्पा कवठे,शरणप्पा फुलारी,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.