Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला माकपची धगधगती मशाल रॅली!

    हेच का शहिदांच्या स्वप्नातील भारत ? 

सोलापूर : दि.१४ (प्रतिनिधी)  भारत देशाला इंग्रजांच्या गुलामीच्या साखळदंडातुन मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. ते आपल्या प्रमाची आहूती देताना देशात लोकशाही ,समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि सुसंपन्न होईल.गरिबी श्रीमंती दरी राहणार नाही, प्रत्येकाला रोजगार मिळेल हे शहिदांचे स्वप्न अधुरे राहिले त्यावेळी शहीद भगतसिंग म्हणाले की, गोरे इंग्रज जातील काळे भारतीय येतील मात्र इथली व्यवस्था बदलणार नाही.हे वाक्य आज तंतोतंत लागू पडते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशात प्रचंड बेकारी,भ्रष्टाचार,अन्याय अत्याचार, कट्टरपंथी जातीयता, धर्मांधता,अज्ञान,अशिक्षितपणा,कुपोषण हे समुळ नष्ट झालेले नाही.हेच शहिदांच्या स्वप्नातील भारत? असा  सवाल करत केंद्र सरकार वर ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी निशाणा साधला. 
 
रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी  भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) सोलापूर जिल्हा समितीच्या  च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त  ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली  भव्य तिरंगा ध्वज सोबत मशाल मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले.   


याची सुरुवात रात्री सात वाजता रेल्वे स्थानक जवळील म.गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून  कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते  मशाल प्रज्वलित करण्यात आले. ही मशाल मिरवणूक पुढे भैय्या चौक येथे कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांना पुष्पहार अर्पण करून पार्क चौक येथील भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून चार हुतात्मा पुतळा येथे मशाल मिरवणुकीचे अभिवादन सभेत रूपांतर झाले. या मशाल मिरवणुकीत तब्बल एक हजार तरुणांनी *आझादी का अमृत महोत्सव चिरायू हो* या घोषवाक्याचे एक हजार टी शर्ट परिधान करून देशभक्तीपर घोषणा देत मिरवणुकीत सहभागी झाले.

• शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अमर रहे 
• उत्सव आहे स्वातंत्र्याचा, सन्मान करुया शहीदांचा 
• एकच नारा, एकच ध्यान व्यर्थ न वीरांचे बलिदान 
• जी जान देंगे, तिरंगा बचायेंगे 
• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा 
• शहीद हुतात्मे जन्मले या मातीत साकारुया शहिदांच्या स्वप्नातील भारत 
• राष्ट्रीय एकता जिंदाबाद 
• लोकशाही समाजवाद जिंदाबाद 
• वर्णभेद, वर्गभेद नही चलेगा 
• जय जवान, जय किसान, जय विज्ञान 
• सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिलमें है, देखना है जोर कितना कातील मै है 
• इन्कलाब जिंदाबाद 
• सत्यमेव जयते 
• वंदे मातरम 
• संविधान जिंदाबाद 
• संविधान कि रक्षा कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे 
• संविधान सर्वांसाठी, हक्कासाठी, न्यायासाठी 
• जातीयतेच्या बेड्या तोडू, संविधानाने भारत जोडू 
• जोहार लाला लजपतराय, जोहार नेताजी सुभाषचंद्र बोस, जोहार कप्टन लक्ष्मी सहगल, जोहार मंगल पांडे, जोहार झांसी लक्ष्मीबाई, जोहार चंद्रशेखर आझाद, जोहार, जोहार अब्दुल हमीद, जोहार क्रांतीसिंग नाना पाटील या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून सोडले.अत्यंत उत्साह व देशप्रेमाचे वातावरणाची निर्मिती केली. 

यावेळी माकपचे जिल्हा सचिव यांनी प्रास्तविक केले. 
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.

 
यावेळी व्यासपीठावर  कामीनी आडम,सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, नसीमा शेख, युसूफ मेजर,रंगप्पा मरेड्डी, म.हनिफ सातखेड, प्रा.अब्राहम कुमार,शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, शंकर म्हेत्रे आदी उपस्थित होते. 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विक्रम कलबुर्गी,विल्यम ससाणे,बापू साबळे,सलीम मुल्ला, वसीम मुल्ला,दाऊद शेख, नरेश दुगाने, शकुंतला पानिभाते,लिंगव्वा सोलापूरे, अशोक बल्ला, दीपक निकंबे,अकील शेख, प्रशांत म्याकल,दत्ता चव्हाण, बाबू कोकणे, वीरेंद्र पद्मा हसन शेख, आरिफ मणियार,बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे,कादर शेख,शाम आडम, मधुकर चिल्लाळ,नरेश गुल्लापल्ली,मल्लेशाम  कारमपुरी, आदींसह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेतले.