सोलापूर : जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि मॉडेल करिअर सेंटर सोलापूर यांच्या विद्यमाने जिल्हयातील नोकरी इच्छूक उमेदवारांसाठी शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी,डिप्लोमा,ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी,एम.ए,बी.एड,बी.पी.एड.अशा प्रकारची एकुण 257 पेक्षा जास्त रिक्तपदे 06 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी ठीक सकाळी 11 ते दुपारी 1 वाजे पर्यत "जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट पार्क चौक,सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट,पार्क चौक,सोलापुर येथे संपर्क साधावा,असे आवाहन,सहायक आयुक्त,संगीता खंदारे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सोलापूर यांनी केले आहे. अधिक माहितीस्तव https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट दयावी.
