सोलापूर : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयाच्या व इतर 4 अशा एकूण 40 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयानी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तसेच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर यांनी दिले.
लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे:-
शिक्षणाधिकारी माध्यमिक – 1, जिल्हा परिषद सोलापूर – 8, तहसिलदार पंढरपूर – 1, महावितरण – 1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख – 1, पोलीस ग्रामीण – 5, गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय – 2, डीसीसी बँक – 1, भविष्य निर्वाह निधी कार्यालय – 1, मा. अपर जिल्हाधिकारी कार्यालय – 1, तहसिलदार मोहोळ – 1, तहसिलदार महसूल – 3, मा. पोलीस आयुक्त – 1, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग – 1, समन्वय – 4, तहसिलदार बार्शी – 1, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी – 1, तहसिलदार उत्तर सोलापूर – 1, जिल्हा उपनिबंधक सोलापूर – 1, इतर – 4.
