Ticker

6/recent/ticker-posts

सोमवारी 03 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन


सोलापूर : जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00  वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,सात रस्ता,सोलापूर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली.



या लोकशाही दिनात मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाच्या निवेदनावर केलेल्या कारवाई अहवाल तसेच  माहिती अधिकार अधि.-२००५ अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती   उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.