Ticker

6/recent/ticker-posts

लखपती दीदी योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण; ३ कोटींहून अधिक महिलांची यशस्वी भरारी


सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ उपक्रमामुळे देशभरातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ३ कोटींहून अधिक महिला स्वतःचा व्यवसाय उभा करून देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. महिलांना दरवर्षी किमान १ लाख रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.


स्वयं-सहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास,आर्थिक मदत आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे अनेक महिला शिवणकाम,हस्तकला, कृषीपूरक उद्योग,दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वावलंबी बनल्या आहेत.


‘लखपती दीदी’ अभियानामुळे महिलांच्या हाताला काम मिळाले असून त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा स्वतः पूर्ण करण्यास सक्षम होत आहेत. महिला सक्षमीकरण, आत्मनिर्भरता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे देशातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून ‘नवभारताच्या’ विकासात महिलांचा सहभाग अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.