Ticker

6/recent/ticker-posts

सोमवार २ मार्च रोजी जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन



सोलापूर : शासन परिपत्रकानुसार जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित  करण्यात येतो . जिल्हा लोकशाही दिन सोमवार दि.०२ मार्च २०२६ रोजी होणार असून  त्या दिवशी जनतेच्या तक्रारी-गाऱ्हाणी  ऐकण्याकरीता त्या त्या विभागातील विभाग प्रमुखांनी  उपस्थित राहण्याचे निर्देश शासन परिपत्रकान्वये देण्यात आले आहेत.
 

तरी माहे मार्च २०२६ चा जिल्हा लोकशाही दिन दि.०२ मार्च २०२६ रोजी  आयोजित करण्यात आला असून सदर दिवशी विभाग प्रमुखांनी आपले कडील मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाचे निवेदनावर केलेली कारवाईचा अहवालासह सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता येथे उपस्थित रहावे. या दिवशी गैरहजर राहणार असल्यास त्याबाबत जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याचे  निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी कळवले आहे.