सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा,छायाचित्रकार,समाज माध्यम तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
सन २०२५ या कॅलेंडर वर्षातील (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५) कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत असून,यापूर्वी निश्चित केलेली अंतिम तारीख १५ मार्च २०२६ होती. आता ही मुदत वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.
सदर पुरस्कारांसाठी आवश्यक माहितीपत्रक व अर्जाचे नमुने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in आणि https://mahasamvad.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रसार माध्यम प्रतिनिधींनी या पुरस्कार योजनेत सहभागी व्हावे व आपल्या प्रवेशिका ३१ मार्च २०२६ पर्यंत सादर कराव्यात,असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय,सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
