जातीभेद नाकारुन प्रेमाचा संदेश देनार महान संत विद्रोही संत रविदास यांची जयंती हरळय्या नगर येधे साजरी
सोलापुर : हत्तुरे वस्ती येथील हरळय्या मगर येथील संत रविदास बहुउद्देशिय सामाजिक मागासवर्गीय संस्थेच्या वतीने फ्रेंन्डस ग्रुप च्या वतीने मसतेचे संत रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंती निमित्त प्रतीमा पुजन व ग्रंथ भेट कार्यक्रम संपन्न.
या प्रसंगी रविदास महाराजिंच्या प्रतिमेचे पुजन प्रा.राजेंद्र लामकाने व प्रा.संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देशाला समतेचा संदेश देनारे महान संत म्हणुन रविदास महाराज यांचा गौरव केला जातो आज खरया अर्थाने त्यांच्या विचारांची आपणा सर्वांना गरज आहे सर्वधर्म समभाव हा संदेश रविदास महाराजांनी दीला तोच वसा अन वारसा फ्रेंन्सड ग्रुप जपतो आहे असे गौरउद्दागार प्रा.जाधव यांनी काढले.
या प्रसंगी प्रा.नंदकुमार बंडगर,प्रा.दिपक शिंदे,प्रा.विनोद थोरात,प्रा.राजिव निकम,प्रा.बंडोपंत बाबर मंडळाचे पदाधिकारीज्ञानेश्वर बनसोडे,राहुल कोरे,राकेश कोरे,आकाश कोडवान,दौलत वनखडे,अप्पु कांबळे उपस्थित होते.
या प्रसंगी मंडळाने आजपर्यंत रक्तदान शिबिर अन्नदान, आरोग्य शिबीर,तसेच महान संत महापुरुष्यांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणुन एक ग्रंथ भेट देन्याचा उपक्रम ही संस्था राबवते असे सामाजिक उपक्रम घेवुन ही जयंती साजरी केल्याचे राकेश कोरे यांनी सांगीतले.
