Ticker

6/recent/ticker-posts

चॅनेलचा खेळ संपला आहे! परवाना परत करण्याचा काळ सुरू झाला आहे तर निर्भीड डिजिटल पत्रकारिताच्या पर्व सुरू

विशेष....

भारतीय वृत्तवाहिन्यांचं भविष्य केवळ संकटात नाही तर या वाहिन्या अधोगतीला लागल्या आहेत.

ज्या माध्यमाने एकेकाळी जनमत घडवले, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आणि लाखो प्रेक्षकांना गुंतवून ठेवले - तेच माध्यम आता रिकामे स्टुडिओ आणि परवाने परत करत आहे.

गेल्या काही वर्षांत,मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी वृत्तवाहिन्या पाहणे बंद केले आहे.

हे केवळ टीआरपीमध्ये घट नाही. तर विश्वासार्हता पूर्णपणे कोसळण्याची कहाणी आहे.

असे होण्याची मुख्य कारणे स्पष्ट आहेत: 

जनहिताच्या बातम्यांपासून दूर 

रात्रंदिवस जातीय, धार्मिक प्रायोजित आणि एकतर्फी वादविवाद

सत्तेला शरण जाणे

एकदा एखाद्या माध्यमाची चूक वा लबाडी उघडकीस आली की,निसर्गनियमानुसार ते दुर्लक्षित होत जाते.



परिणाम?

जवळजवळ ५० टीव्ही वाहिन्यांनी त्यांचे प्रसारण परवाने परत केले आहेत.

जाहिरातींच्या महसुलात लक्षणीय घट.

ऑपरेशनल खर्च वाढतच आहे.

कमी प्रेक्षक = कमी जाहिराती = चॅनेल बंद.

अलीकडील उदाहरणे:

एबीपी न्यूजची एचडी वाहिनी बंद.

एनडीटीव्ही गुजराती वाहिनीचा परवाना रद्द.

सोनी (कलव्हर मॅक्स) ने २६ डाउनलिंकिंग परवानग्यांवर पाणी सोडले.

झी,जिओस्टार, टीव्ही टुडे, एनडीटीव्ही आणि एबीपी सारख्या प्रमुख नेटवर्क्सनीही त्यांची अनेक चॅनेल्स बंद केली.

प्रादेशिक चॅनेल्स सर्वात आधी बंद होत आहेत. खरे तर हीच  चॅनेल्स  एकेकाळी ग्राउंड रिपोर्टिंग करत असत.

अनेक राज्यांमधील अद्याप सुरू असलेली चॅनेल्सदेखील माहिती विभाग आणि मंत्रालयांच्या जाहिरातींवर टिकून आहेत.



एका मोठ्या कंपनीचे सीईओ म्हणाले,

"आमचे वार्षिक प्रचार बजेट २० कोटी रुपये होते.
कमी होत चाललेली क्रयशक्ती, निर्यात संकट आणि चीनकडून येणाऱ्या आव्हानामुळे हे आता शक्य नाही."

ही फक्त भारताची गोष्ट नाही.

अमेरिका आणि युरोपमध्ये केबल न्यूजमध्ये सातत्याने घट होत आहे.

तरुण प्रेक्षक टीव्ही सोडून YouTube,पॉडकास्ट आणि डिजिटल न्यूजकडे वळत आहेत.

सीएनएन,बीबीसी आणि फॉक्स सारख्या नेटवर्क्सना देखील डिजिटल स्वरूपात कंटेंट देण्यास भाग पाडले जात आहे.

भारतात बदल आणखी जलद होत आहे.



ज्येष्ठ पत्रकारांसाठी स्वत:ची YouTube चॅनेल्स सुरू केली आहेत. 

इथे सेन्सॉरशिपमुक्त आणि संदर्भसंपन्न कंटेंट असतो. मोकळेपणे केलेली टीका असते. ही युट्युब चॅनल्स घडामोडींबाबत त्वरित प्रतिक्रिया देतात. असहमती व्यक्त करतात.

सायंकाळी ६ ते ८ काळातल्या चर्चेच्या नावाखाली लावल्या जणा-या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या झुंजीपासून या पत्रकारांची सुटका झाली आहे.  





आता नवीन प्रयोग सुरू आहेत.

लहान राज्यांमध्ये GPS-ट्रॅक केलेल्या LED व्हॅनमुळे
कमी खर्चात थेट सार्वजनिक संवाद करता येतो. स्टुडिओतलं नाटक बंद झालं आहे.  

वृत्तवाहिन्यांच्या इतिहासातले टप्पे लक्षात ठेवा

१९६५: दूरदर्शनचे पहिले ५ मिनिटांचे बुलेटिन

१९९१: CNN आणि आखाती युद्ध

१९९२: झी न्यूज

२०००-२०२०: चॅनेल्सचा स्फोट

२०२५ नंतर: शरणागतीचा काळ

सत्य कटू आहे. तुम्ही चॅनेल उघडू शकता. मात्र 
तुम्ही प्रेक्षक खरेदी करू शकत नाही.

आता या वृत्तवाहिन्या जनतेपासून तुटल्या आहेत. का? 

तंत्रज्ञानामुळे नाही तर अविश्वसनीयतेमुळे.

हे वृत्तवाहिन्यांवर आलेलं संकट म्हणजे प्रत्यक्षात पत्रकारितेचा आरसा आहे.

पवन सिंह - जन-गण-मंगलदायक पेजवरून साभार.

डिजिटल मीडियाचा पर्व सुरू एमडी२४न्यूज