वळसंग येथील एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूलचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात,आनंदात व जल्लोषात पार पडले.
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वळसंग येथील एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूलचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन दि.१३ फेब्रुवारी शनिवार रोजी सोलापूर येथील डॉ.निर्मलकुमार फडकुले संकुलन हॉल येथे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात,आनंदात व जल्लोषात पार पडले.
एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूलचे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलना - मध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम महाराष्ट्राचा इतिहास,आई-वडिलांचा आदर,उर्दू आणि इंग्रजी गाण्यावर नृत्य,सारे जहाँ से अच्छा गीतावर नृत्य,हैदराबादी ड्रामा,उर्दू हमारी पहचान,महाराष्ट्राचा फेवरेट वडापाव गरिबांचा बर्गर,मोबाईलचा अतिवापर या विविध विषयावर नाटक व गीतांवर नृत्य विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सुप्रभात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा बालभारती शिक्षण समूहाचे प्रमुख शब्बीर शेख यांच्या हस्ते रोपांना पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.आसिफ इक्बाल यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की,आज गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नितांत गरज आहे; मात्र गरीब व मागास विद्यार्थ्यांसाठी अशा शिक्षणाची सुविधा सहज उपलब्ध नसते. त्यामुळे एम्सच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. “एम्स ही ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची लोकचळवळ आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावर्षी किमान २५ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत देण्यात आले.
प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक इरफान केरुल यांनी - ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एम्सचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. जाकीर अत्तार यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले,तर सेवानिवृत्त प्रा.सी. जी.अत्तार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. डॉ. सिराज मोमीन,ॲड.अब्दुल जब्बार शेख,अब्दुल गनी कुरेशी, शेरली शेख,नुसरत शेख,शफी कुरेशी,सद्दाम शेख आणि हन्नान शेख आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध कवी सिराज सोलापूरी,जुबेर शेख आणि सीए मौलाना शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी - मुख्याध्यापिका मिसबा शेख,शाहीन तोडमोड,परवीन शेख,नूरैन शेख,अश्विनी दीपक, दीपक हवाले,मौलाना सादिक,अ.मजीद मो.इसाक,अल्ताफ कुडले,वाईज शेख आणि जैद शेख यांनी परिश्रम घेतले. एम्सच्या विद्यार्थ्यांचे बालपण जपण्यासाठी सातत्याने योगदान देणारे सहकारी साहित्यिक सरफराज अहमद यांचा छाया प्रकाश फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पालकांनी आपल्या पाल्यांना प्रथमच व्यासपीठावर पाहताना भावूक होत आनंदाश्रू ढाळले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - मोईज शेख यांनी केले. शेवटी पालकांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी एमडी२४न्यूजशी बोलताना दिली.
