स्थायी समिती,विशेष समिती सभापती,स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड
सोलापूर : सुत्रांच्या माहितीनुसार महापौरच्या निवडीनंतर आता सोलापूर महापालिकेत राजकीय हालचालींना पुन्हा वेग २० फेब्रुवारी शुक्रवार रोजी महापौरांनी विशेष सभा बोलावली असून या सभेत महापालिकेच्या सत्ताकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतींसह सर्व विषय समितींच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. याच सभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती देखील होणार आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन स्तरावर तसेच सत्ताधारी भाजपाकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. विशेषतः स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून अनेकांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लाॅबिंग सुरू केले आहे.
महापालिकेच्या नियमानुसार एकूण दहा स्वीकृत नगरसेवक सभागृहात दाखल होऊ शकतात. यामध्ये सत्ताधारी भाजपाच्या नऊ तर ए आय एम आय एम च्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजपामध्ये कोणाला संधी द्यायची यावरून अंतर्गत चर्चा,समीकरण आणि नाराजीचे सूर देखील उमटत आहेत. दरम्यान,शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीनंतर या संपूर्ण प्रक्रियेला अधिक गती मिळाल्याने येत्या २० फेब्रुवारी शुक्रवार रोजी विशेष सभा बोलवण्यात येईल अशी माहिती सूत्राकडून देण्यात आले.
