सोलापूर सोशल उर्दू शाळेतर्फे राष्ट्रीय उर्दू दिनानिमित्त भव्य ‘प्रतीकात्मक मुशायरा’ संपन्न
सोलापूर : राष्ट्रीय उर्दू दिनानिमित्त येथील निर्मलकुमार फडके हॉल येथे सोलापूर सोशल उर्दू प्राथमिक शाळेच्यावतीने ‘प्रतीकात्मक मुशायऱ्याचे’ आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अखलाक अहमद वडवान होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण शर्मा उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी हाजी दाऊद मंगलगिरी,सचिव रियाज चंदरकी,ट्रस्टी जाहिद अली खान,अशफाक सातखेड, इम्तियाज शेख,अॅड.अब्दुल जब्बार शेख,सरफराज पठाण तसेच मुख्याध्यापक इरफान केरुल आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आसिफ इक्बाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी शर्मा स्वीट्सचे मालक अरुण शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या काव्यप्रतिभेचे कौतुक करताना सांगितले की, “उर्दू भाषेची जादू प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करते.”
सुमारे ५० विद्यार्थ्यांनी विविध नामवंत कवींची रचना सादर केली. लहानग्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व सुंदर शैलीत काव्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अक्सा शेख आणि आयेशा शाहबाद यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला रंगत आणली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.गौसअहमद शेख, निखत शेख,अनीसा शेख, रेहाना शेख,रिझवाना प्यारे, कुदसिया मनियार,नूरजहाँ बागमारु,शेख शहर बानो, शाहाबाद उम्मुलफर,शबाना काझी,विकारुन्निसा बंदूकवाले, समीना मनियार,तस्कीन कलबुर्गी,शिलेदार महजबीन, गौसिया होटगी,शाहीन शेख,अर्शिया होटगी,तरन्नुम पत्तेवाले, हुमैरा शेख,नाहिदा शेख,मुश्ताक गदवाल,समीर अहमद निचलकर,आकिद शेख,इरफान पटेल,मोईज सिराज अहमद, जमीर मुलानी,अब्दुल वहाब चांदा आदींनी परिश्रम घेतले. शेवटी मोईज सिराज अहमद यांनी आभार मानले.
