Ticker

6/recent/ticker-posts

औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुरक्षित इंटरनेट दिवस (AI) आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न


सोलापूर : इंटरनेटच्या वापराबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित एन आय सी अधिकारी रवी पवार,प्राचार्य मनोज बिडकर,असरेड्डी,शिल्पनिरीक्षक नितीन भांगे,शिल्पनिरीक्षक मस्करे,शिल्पनिरीक्षक अमित चव्हाण,गटनिदेशक म्हेत्रे मॅडम,गटनिदेशक गोरेकर.

प्रथम प्राचार्य मनोज बिडकर यांनी इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल माहिती दिली त्यावेळी ते म्हणाले की,इंटरनेटचा वापर करतेवेळी फायदेही आहेत व तोटेही आहेत त्याबद्दल सर्वांनी त्या दृष्टीने जागरूक व्हावे. फसव्या लिंक वर पासून सावधान राहण्यास सांगितले. फसवे कॉल व त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करून केली जाणारी आर्थिक फसवणूक याबद्दल प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहावे. बँकेकडून वेळोवेळी सुरक्षेबद्दल माहिती उपलब्ध केली जाते कोणतीही बँक कोणत्याही खातेदाराला फोन करून त्यांची खाते विषयी माहिती विचारत नसतात किंवा ओटीपी मागत नसतात तसे कॉल जर आपल्याला येत असतील तर त्यासंबंधी साय बर टोल फ्री क्रमांक १९३० वर तात्काळ तक्रार नोंदवावी असे सांगितले.

एन आय सी अधिकारी रवी पवार यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या वापराबद्दल माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की संपूर्ण भारतात आजच्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस हा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यानंतर इंटरनेटच्या जबाबदारीने वापर कसा करावा याबद्दल सर्वांनी प्रतिज्ञा केली.





इंटरनेटच्या दैनंदिन वापरा संबंधित पुढील काही मुद्दे सर्वांनी लक्षात घ्यावे.

इंटरनेट वापराचे फायदे - 
१. इंटरनेट म्हणजे जागतिक स्तरावर संगणक व इतर डिजिटल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळे नेटवर्क होय. 
२. डिजिटल पेमेंट
३.  ई लर्निंग 
४. एंटरटेनमेंट 
५. सोशल मीडिया 
६. मेकॅनिझम टू रिपोर्ट सायबर क्राईम

इंटरनेट वापराचे तोटे - 
१. इंटरनेट वापराचे व्यसन, 
२. मानसिक आरोग्य, 
३. सामाजिक एकाकीपणा,
४. ऑनलाइन फसवणूक 
५. सायबर थ्रेट, 
५. OTP-UPI पिन फसवणूक, 
६. ऑनलाइन शॉपिंग स्कॅम आणि डिजिटल अरेस्ट स्कॅम, यांपासून सावध रहाणे गरजेचे आहे. तरीसुद्धा धोका झाला तर संबंधित खाते फ्रीज करण्यासाठी व एटीएम क्रेडिट डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासंबंधी बँकेला कळवावे,व नॅशनल सायबर क्राईम पोर्टल वर तात्काळ तक्रार नोंदवावी.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे (AI) च्या दैनंदिन वापरा संबंधित माहिती

 • (AI) चा वापर आणि त्याचे फायदे 
     आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
•  AI इमेज रिकग्निशनच्या माध्यमातून उत्पादन ओळखून त्यावर आधारित शिफारसी दिल्या जातात.
•  फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियावर तसेच नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर आपल्या  
    आवडीप्रमाणे कंटेंट सुचवला जातो.
• अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादने दाखवली जातात.

• AI मुळे समाजाला अनेक प्रकारे मदत होत आहे –
• आरोग्य सेवा : आजारांचे लवकर निदान, उपचार नियोजन
•  कार्यक्षमता : वेळ व खर्च वाचवणे, कामांची अचूकता वाढवणे
• खरेदी : योग्य उत्पादनांची शिफारस
• पर्यावरण : प्रदूषण नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन
• शिक्षण : वैयक्तिक शिक्षण पद्धती, ऑनलाइन शिक्षण सुलभ करणे

• AI आपल्याला तीच माहिती दाखवतो जी गुगल सर्च इंजिन वर उपलब्ध असते.

• AI चा चुकीचा वापर
 काही लोकांकडून AI चा गैरवापर होऊ शकतो, जसे की –
इतर लोकांची वैयक्तिक माहिती लोकेशन,संपर्क क्रमांक,पत्ता,फोटो शोधणे किंवा वापरणे त्यांच्या गोपनीय माहितीचे उल्लंघन करणे

• सायबर हायजिन (Cyber Hygiene) – सुरक्षिततेसाठी उपाय
 सायबर सुरक्षेसाठी खालील सवयी अंगीकारणे गरजेचे आहे:

• ई-मेल व इतर खात्यांचे पासवर्ड नियमितपणे अपडेट करणे
• मजबूत पासवर्ड वापरणे
• दोन-स्तरीय प्रमाणीकरण (Two Factor Authentication) सुरू ठेवणे संशयास्पद लिंक व संदेशांपासून दूर राहणे.

एवढ्या सगळ्या सुरक्षितता बाळगूनही आपल्याला जर धोका झाला तर सायबर क्राईम टोल फ्री क्रमांक (१९३०) वर तात्काळ तक्रार नोंदवावी असे सांगितले.