मुंबई उच्च - न्यायालय कोल्हापूर खंडपीठ - खुनाचा प्रयत्न तिघांवर गंभीर जीवघेणा चाकू-हल्ला केल्याप्रकरणी वर्षभरापासून अटकेत असलेल्या आरोपीस सशर्त जामीन मंजूर
सोलापूर : धारदार चाकूने खुनाचा प्रयत्न करत तिघांवर गंभीर जीव-घेणा हल्ला केलेल्या आरोपाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.क्रमांक ०२५३/२०२४, दि.२३ मे २०२४ रोजी भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३०७,३२३,३५४-ड,३२३,५०६ प्रमाणे आरोपी अण्णाप्पा उर्फ अप्पू शरणाप्पा गिराम रा.दोडड़ी ता. दक्षिण सोलापूर जि.सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर प्रकरणात फिर्यादी दत्तात्रेय बसणणा चौगुले रा.दोडडी यांनी दिलेल्या जबाबानुसार, यातील आरोपी अण्णाप्पा गिराम हा फिर्यादीच्या पुतणीचा पाठलाग करत मागील तीन महिन्यांपूर्वी त्रास दिला होता. तसेच २३ मे २०२४ रोजी देखील सकाळी ८:१५ च्या सुमारास आरोपी हा फिर्यादीच्या पुतणीकडे पाहून मोठमोठ्याने फोनवर बोलत असे तसे मोठमोठ्याने गाणी म्हणत हात-वारेकरीत उभा होता.
आरोपी अण्णाप्पास विचारले असता आरोपीने फिर्यादीची गच्ची पकडून तसेच त्याचा गळा दाबून खाली पाडून त्याच्याजवळ असलेला चाकू पोटात व छातीत खुपसला होता व त्यामुळे फिर्यादीच्या पोटात व छातीवर गंभीर जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाले होते.
फिर्यादीच्या बचावासाठी त्याची वहिनी पुतणी व भाऊ असे सोडविण्याकरिता मध्ये आले असता त्यांच्यावर देखील आरोपी अण्णाप्पा याने वहिनी यांच्या हातावर चाकूने वार केले होते तसेच पुतणीच्या दोन्ही हातावर वार केले व भाऊ विश्वनाथ यास देखील लाथा बुक्क्यांनी मारहण केली होती. तदनंतर फिर्यादीस त्याच्या घरातील लोकांनी खाजगी वाहनातून उपचाराकरिता श्री.मार्कंडे रुग्णालय सोलापूर येथे आय सी यू मध्ये दाखल केले होते. सबब प्रकरणात आरोपीस दिनांक २७ मे २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे आपला जामीन अर्ज दाखल केला होता व तो अर्ज न्यायालयाने खारीज केला होता. त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मुंबई-उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठात दाखल केला होता. आरोपीचा जामीन अर्ज दि.१७/१२/२०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.सौरभ तांदळे,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मनीष बाबरे,ॲड.अजय वाघमारे आणि ॲड.त्वरिता वाघ यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲड.आनंद शलगावकर यांनी काम पाहिले.
