सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या संगणक विभागामार्फत दिनांक ०१ जून २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी संगणक विभागाशी संलग्न राहून महानगरपालिकेतील विविध तांत्रिक व प्रशासकीय कामकाजात सहभाग नोंदवला. त्यांनी दिलेली सर्व कार्ये प्रामाणिकपणे,मनोभावे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पूर्ण केली.
या प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य,कार्यातील लवचिकता तसेच संघभावना प्रदर्शित करत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्याचे मूल्यांकन अत्युत्तम असे करण्यात आले असून संगणक विभागाने त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सोहळा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयुक्त यांच्या हस्ते शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज कॉम्प्युटर डिपार्टमेंट सायन्सचे राजवीर वडनाल,श्रावणी भोसले मगरुमखाने प्रणाली,चाफाकरांडे श्रद्धा,उदगीरी स्नेहा, शेख जुनैद अहमद,मुजावर सोहा फरहत सिद्रल सोनिया,रनदिवे संजीवनी,मेंदगुळे सुकन्या,दुधाणी साक्षी,फुलारी हुरीया पाटील सप्तश्रृंगी,वांजारी ओम,भोसले आदित्य,बनसोडे वैभव सिव्हील डिपार्टमेंट चे कृष्णाली मोरे,वैष्णवी कुलकर्णी,अक्षय नराल,कावेरी साका ऋषिकेश नामजी, मोहम्मद रियान शेख,अन्वय थोरात समर्थ ढेपे या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या प्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका आकूलवार,संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रशासनातील तांत्रिक प्रक्रियेचा अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या करिअरला निश्चितच बळकटी मिळेल. सोलापूर महानगरपालिका नेहमीच अशा शैक्षणिक व व्यावहारिक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील.” सोलापूर महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या या योगदानाचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
