सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यास्थितीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी.भाडे दराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत.
दि. 17 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त असतात. प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर च्या कार्यक्षेत्रातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी.प्रमाने खाजगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करून व त्याप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रति आसन दरपत्रक तसेच हेल्पलाईन क्रमांक प्रसिध्द करण्यात आहेत.
प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत या कार्यालयाच्या ई-मेल आयडी mh13@mahatranscom.in व टोल फ्री क्रमांक 9420564513 वर तक्रार नोंदविण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
