Ticker

6/recent/ticker-posts

वडार समाजाला राजकारणात प्रतिनिधित्व मिळावे : आ. प्रवीण दरेकर


 

पुणे : महाराष्ट्र राज्य वडार समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक पुण्यातील मजूर फेडरेशन येथे मोठ्या उत्साहात पार पडली,या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर,वडार समाजाचे राष्ट्रीय नेते संजीव कुसाळकर हे होते.



या बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की,वडार समाजातील व्यक्तींना राजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळावे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने समाजातील विद्यार्थी आयएएस आयपीएस अधिकारी व्हावे,परंपरा असलेल्या वडार समाज आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला पाहिजे,असे प्रतिपादन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. 




या कार्यक्रमाचे संयोजन मुकुंदराव पवार,मनोहर मुधोळकर यांनी केले तर या बैठकीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दहा दहा प्रतिनिधी उपस्थित होते.यात प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सातपुते,वसंतराव गुंजाळ धुळे,मनोहर मुदळकर सोलापूर,रमेश जेठे अहिल्यानगर,रमेश शिंदे पुणे,महादेव मंजुळकर नांदेड,भारत रॅपनवाड नांदेड,आदी मान्यवर उपस्थित होते.