सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील मीना नगर येथे हद्दवाढ झाल्यापासून कुठल्याच सोई सुविधा नव्हत्या तेथील नागरिक सोलापूर महानगरपालिकेला शंभर टक्के टॅक्स भरून सुद्धा त्यांना नागरिक सुविधा उदा. पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज लाईन,अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती,मिळालेल्या नव्हत्या परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या २०१७ साली निवडून आल्यानंतर तेथील जागरूक नागरिक प्रकाश चव्हाण यांनी सदर मीना नगर मधील विविध समस्या बाबतीत माजी नगरसेविका चव्हाण यांना समस्या सांगितल्यानंतर प्रथम प्राध्यान्याने तेथे पाण्याची पाईपलाईन टाकून देण्यात आली व नंतर शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोस्थान योजनेतून अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकून झाल्यानंतर सदर नगरामध्ये महापालिके मध्ये पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेऊन आज काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आले.
त्याप्रसंगी तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही सदर नगरामध्ये जवळपास २० ते ३० वर्षापासून वास्तव्यास असून आम्ही सोलापूर महानगरपालिकेला शंभर टक्के टॅक्स भरतो परंतु आम्हाला महापालिकेकडून कुठल्या सोयी सुविधा म्हणाव्या तशा मिळालेल्या नाहीत परंतु नगरसेविका चव्हाण यांना सांगितल्यानंतर तातडीने आमच्या समस्या सोडविल्या आहेत व उर्वरित राहिलेले दिवाबत्ती लाईट लवकरात लवकर चालू करून देण्यात यावे व राहिलेले उर्वरित काम हे तुम्हीच करू शकता ही आम्हाला शाश्वती आहे असे मनोगत व्यक्त केले.
त्याप्रसंगी सदर नगरातील प्रकाश चव्हाण,रमेश रजपुत,रुपेश राठोड,शशिकांत शिंदे,साहिल चव्हाण, बिराप्पा बिराजदार,रेखा चव्हाण,अंबिका बंडगर,लंगोटे ,पवार,प्रशांत काळे,ठेकेदार अलकुंटे तसेच नागरिकांच्या मदतीला सदैव धावून येणारे भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण आधी उपस्थित होते.
