सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस ट्रेनिंग स्कुल मधील पोलीस ट्रेनिंग घेत असलेल्या १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस ट्रेनिंग स्कुलचे अधिकाऱ्यांनी ताबडतोब विषबाधा झालेल्या पोलिसांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सामायिक अन्नपदार्थांच्या सेवनामुळे ही घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये पोटदुखी आणि मळमळ यासारखी लक्षणे असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विषबाधा झालेले सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस शुद्धीवर आहेत.
केगाव येथील पोलीस ट्रेनिंग केंद्रात विषबाधा - सोलापूर पुणे महामार्गावर केगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. राज्यात विविध जिल्ह्यात भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. सद्यस्थितीत साडेतेराशे पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास ट्रेनिंग सुरू होण्या अगोदर सामायिक नाष्टा देण्यात आला होता. काही वेळाने प्रशिक्षण सुरू असताना प्रशिक्षणार्थी पोलिसांनी उलटी मळमळ सारखा त्रास सुरू झाला. ट्रेनिंग सेंटर मधील अधिकाऱ्यांनी ताबडतोब सर्व प्रशिक्षणार्थी पोलिसांना सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले,विषबाधा झालेले सर्व प्रशिक्षणार्थी पोलिस सुखरूप आहेत,अन् उपचार सुरू आहे.