देहूरोड : येथील न्यु स्टार यंग सर्कल व न्यु स्टार मित्र मंडळ यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप तसेच इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलादुन्नबी) खीर वाटप कार्यक्रमाचे आयोजन देहूरोड येथील बॅंक ऑफ इंडिया जवळ करण्यात आले.
या उपक्रमामुळे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले. सर्व धर्मीय नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजातील बंधुभाव,प्रेम व ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे न्यु स्टार यंग सर्कल चे अध्यक्ष फारुख शेख यांनी सांगितले. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म इ.स.५७० मध्ये अरब स्थानातील मक्का येथे झाला. अल्लाहकडून त्यांना कुरआन शरीफ चा वाही (संदेश) प्राप्त झाला. त्यांनी मानवतेचा संदेश देत सर्वांना समानतेचा,सत्याचा, प्रामाणिकपणाचा व दयाळूपणाचा मार्ग दाखविला.जात, धर्म,वर्ण,पंथ यापलीकडे जाऊन त्यांनी सर्वांना बंधुता,एकता व शांततेचा उपदेश केला. त्यांच्या शिकवणीत गरीब,अनाथ,विधवा व समाजातील दुर्बल घटकांची सेवा करण्यावर भर देण्यात आला आहे. इस्लाम धर्मातील ‘इमान,नमाज,रोजा,जकात व हज’ ही पाच स्तंभ तत्वे मानवाला योग्य जीवनपद्धतीची दिशा दाखवतात. अशा प्रकारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जीवन परिचय फारुख शेख यांनी सांगितले.
या प्रसंगी सलीम हाजी शेख,इब्राहिम इस्माइल शेख,खादर हाजी शेख,खलील इस्माइल शेख,ईरेश अन्ना,अरशद महबूब शेख,रिहान महबूब शेख,तोफिक खान,मोहम्मद आरिफ खान,अरबाज खान,सागर रेड्डी,अमूल पिट्टेलु,निखिल रेड्डी,आदित्य पिट्टेलु,प्रथमेश भागव,राकेश तेलुगु,सादिक शेख,रफिक महबूब शेख,शोएब खान,शबीर शेख,अनिल याल्पुला,अशोक याल्पुला,अयान शेख,अहान शेख,अरहान शेख,बादशाह शेख.न्यु स्टार यंग सर्कलचे पदाधिकारी,कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.