विशेष...
३३ कक्षीय संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक आहेत. शिवधर्म हा जगातील सतरावा धर्म आहे. अभ्यास व संशोधन करुन त्यांनी शिवधर्म स्थापन केला.
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेंबर १९९० रोजी जिल्हा अकोला येथे सेवा सेवा संघाची स्थापना केली. प्रारंभी मुठभर कर्मचारी-अधिकाऱ्यांचं संघटन अशी जनमाणसांत ओळख असलेला मराठा सेवा संघ,बहुजन तरुणाईच्या हाती पुस्तक देत राहिला. ज्यामुळं ते बहुजनांच्या सांस्कृतिक चळवळीचं केंद्र बनले. समाजातील प्रबोधनातून विचारमंथन करणारा बहुजन वर्ग पुढं आला. आज तरूणाई हाती दगड घेण्याऐवजी पुस्तक घेते,याचं सर्वस्वी श्रेय मराठा सेवा संघाला जाते,हे कोणीही नाकारणार नाही.
याच मराठा सेवा संघाला जाणणारा मोठा वर्ग तयार झाला. ३३ वर्षापासून कोणत्याही सुरक्षा कवचाशिवाय कार्यकर्त्यांच्या हिंमतीवर खेडेकर आजही एकटेच फिरत आहेत.
मराठा सेवा संघ वर्धापन दिनाच्या शिव शुभेच्छा १ सप्टेंबर १९९० ला मराठा सेवा संघाची स्थापना शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली. मराठा सेवा संघाला आज ३५ वर्षे पूर्ण होत आहे. आज मराठा आरक्षणाची लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या एका हाकेवर लाखोंच्या संख्येने मुंबईत आरक्षणाचा किल्ला लढवित असलेल्या संघर्ष यात्रींसोबत सेवा संघाने पेरलेल्या विचारांचा पदोपदी प्रत्यय येतो. सर्व शांततामय आणि खेळीमेळीनं चाललेलं आंदोलन हेही,मराठा सेवा संघाच्या ३५ वर्षांच्या अथक परिश्रमाचं फलित आहे,असा माझा विश्वास आहे.
आरक्षणाच्या आंदोलनात,आंदोलनकर्त्यांचा नाही,तर शासनाचा परिक्षा काळ आहे.
शिव-फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ. आज संपूर्ण महाराष्ट्रात बहुजन समाज प्रबोधन करण्याचे कार्य मराठा सेवा संघाने केलं आहे आणि करत आहे. महाराष्ट्रातील तरुणांना सत्य इतिहास काय आहे, हे मराठा सेवा संघाने प्रबोधनाच्या माध्यमातून सांगितले,मित्र आणि शत्रूंची साध्या सोप्या शब्दात ओळख करून देण्याचं सर्व श्रेय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना जाते, हे मात्र निश्चित !
वर्धापनदिनी शिवमय शुभेच्छा !
शुभेच्छुक - एमडी२४न्यूज़ परिवार...