सोलापूर : सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन लि.सोलापूर हि संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अन्वये नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पी. 2964/1958 दिनांक 21/03/1958 असा आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 (अ) (1-अ) मधील तरतुदीनुसार संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झल्यामुळे संस्थेचे सभासद यांना संस्था चालविण्यास स्वारस्य राहिलेले नाही असे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. तरी संस्थेचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी संस्थेवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 (अ) (1-अ) अन्वये प्राधिकृत अधिकारी नियुक्त का करण्यात येवू नये? याबाबतच्या आपल्या हरकती /सुचना/ लेखी खुलासा हि नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द केल्यापासून 07 दिवसाच्या आत किंवा दि. 23 जनू 2025 रोजी पर्यंत या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून सादर कराव्यात. आपले म्हणणे हरकती/सूचना/ खुलासा प्राप्त न झाल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरुन, संस्थेवर प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी,अशी माहिती सहायक आयुक्त, वस्त्रोद्योग सोलापूर निलेश निखाडे यांनी दिली आहे.