सोलापूर : क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सुब्रोतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली द्वारा सन 2025-26 या वर्षात 64 वी आंतरराष्ट्रीय सुब्रोतो कप फुटबॉल (सबज्युनिअर, ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा सन 2025 चे आयोजित करण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय स्पर्धा दिनांक 18 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीत 15 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले,मुली या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होणार आहेत.
सदर स्पर्धेस सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्म तारखेनुसार वयोमर्यादा पुढील प्रमाणे - अ). 15 वर्षाखालील मुले त्यांचा जन्मदिनांक 1 जोनवारी 2011 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. ब). 17 वर्षाखालील मुले,मुली जन्म दिनांक 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
जिल्हास्तर सुब्रोतो फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम खालील प्रमाणे - 15 वर्षे मुले स्पर्धा कालावधी दिनांक 25 जून 2025 स्पर्धा उपस्थिती दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता, 17 वर्षे मुले,मुली स्पर्धा दिनांक 26 जून 2025 स्पर्धा उपस्थिती दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता वालचंद कॉलेज सोलापूर येथे उपस्थित रहावे. व संघटना प्रतिनिधी किरण दुस्तकर मोबाईल क्रमांक - 8788192124 किंवा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड मोबाईल क्रमांक -7219157272 यांच्याशी संपर्क साधावा. उपरोक्त कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालये मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांना कळविण्यात येते की,आपल्या शाळेचे संघ निवड करून सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी 19 जून 2025 रोजी करणे अनिवार्य आहे. तसेच प्रत्येक सहभागी संघानी रुपये 2 हजार रुपये सदर स्पर्धेच्या प्रवेशिका दिनांक 19 जून 2025 रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कुमठा नाका सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.