Ticker

6/recent/ticker-posts

रूपाली चाकणकरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा



सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांची मागणी,रूपाली चाकणकर राजीनामा द्या सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीचा एल्गार.                  
रूपाली चाकणकरांवर  सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केली. वैष्णवीच्या मोठ्या जाऊ बाई मयुरी हगवणे यांनी सासरी होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल  महिला आयोगाकडे 2024 मध्येच तक्रार दाखल केली होती परंतु रूपाली चाकणकर यांनी त्याची दखल घेतली नाही, चाकणकरांच्या पक्षपातीपणामुळे, निष्क्रियते मुळे तिच्या सासरच्यां मंडळी वर गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे ते मोकाट सुटले व त्यांना कायद्याची जरब न बसल्यामुळे वैष्णवी चा बळी गेला त्यामुळे रूपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करून चाकणकर राजीनामा द्या असा एल्गार सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवसेना उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला--घोषणा व बाईट यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी,शहर संघटक स्वाती रुपनर,जोहरा रंगरेज उपजिल्हा संघटक ज्योती माळवतकर,उपशहर संघटक मीना सुरवसे,रमा सरोदे,तालुका संघटक महानंदा,चला सर्व दे,श्रीदेवी फलमारी,भाग्यश्री चाकणकर,रतन गायकवाड आदी महिला व पदाधिकारी उपस्थित होते.