Ticker

6/recent/ticker-posts

अपंग प्रशिक्षण केंद्रात 30 जुन पर्यंत अर्ज पाठवावा

सोलापूर : दिव्यांग कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, पुणे शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अंपग प्रशिक्षण केंद्र,देगलुर या संस्थेत म.रा.व्यवसाय शिक्षण व परिक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील दिव्यांग,मुकबधीर,मतिमंद मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. सरपरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तन कला,कॉम्प्यूटर अकॉटिंग व ऑफिस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इ. अध्याक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.

तरी इच्छुक दिव्यांग,मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किवा पालकांनी दि. 30 जुन 2025 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,देगलूर जि.नांदेड येथे पत्रव्यवहार करावे किंवा समाक्ष भेटावे.

शाळेचा पत्ता - भायेगाव रोड,देगलुर ता.देगलुर जि. नांदेड
मो.नं 9960900369, 9403207100, 7378641136.