Ticker

6/recent/ticker-posts

पठाण परिवाराकडून लक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण शुभारंभ

पठाण परिवाराकडून लक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण शुभारंभ करण्यात आले.

सोलापूर : इंगळे वस्ती निलम नगर येथील आशा मराठी विद्यालय आणि धर्मण्णा सादूल प्रशालेच्या क्रिडागंण समोरील जागेत पुरातन काळापासून लक्ष्मी मंदिर आहे. याला अवकळा आली होती. शिक्षण समूहाचे संस्थापक हारुण पठाण परिवाराच्या वतीने या मंदिर परिसराचे सुशोभीकरण स्व: खर्चाने करण्यात येणार आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर  भूमीपुजन व विष्णू इंगळे व जगदिश मुसळे व भिमा कोरे व चिदानंद निंबाळ या दाम्पत्यांच्या शुभ हस्ते देवीस खणा नारळाची ओटी भरली आणि भूमिपूजन करण्यात आले. तसेच थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.
        
या प्रसंगी आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिमबानो पठाण,धर्मण्णा सादूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ आफरिन सय्यद मराठा सेवा संघाचे राम गायकवाड आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

चौकट -  पठाण परिवाराकडून हिंदू मंदिर परिसराचे सुशोभीकरण हे बंधुभाव जपणार कार्य आहे. यामुळे धार्मिक एकोपा वाढीस लागेल. श्रध्दास्थान सुशोभीकरण केल्याने एक आत्मिक समाधान मिळेल असे मत हारुण पठाण यांनी व्यक्त केले.

चौकट - पठाण परिवाराच्या वतीने या पुर्वी ही मातंगी मंदिरा साठी जागा उपलब्ध करून देऊन मंदिराच जिर्णोध्दार केले होते. निलम नगर परिसरातील शैक्षणिक,सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच सहकार्याची भूमिका असते.