Ticker

6/recent/ticker-posts

अराईज इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

हत्तुरे वस्ती येथील अराईज इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

सोलापूर : प्रभाग क्रमांक 25 मजरेवाडी,विमानतळ परिसरातील हत्तुरे वस्ती येथे अराईज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी माजी मुख्याध्यापक लक्ष्मण कोळी सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. संस्थेचे संस्थापक विजयकुमार हत्तुरे अध्यक्षस्थानी होते.                    

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नागरिक बी.एस.बिराजदार, महादेव कापसे,गवई,कुमार कांबळे,दक्षिण सोलापूर आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष रामजी गायकवाड, आरपीआय राजरत्न आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष प्रशांत रेटरे,भीम क्रांती संघटनेचे अध्यक्ष रुद्रप्पा कांबळे,बसवराज कोठाणे,विजय कांबळे,गंगाधर कांबळे,प्रसाद चोरगी,शितोळे आदी उपस्थित होते.                                                                           
यावेळी संस्थेचे मुख्याध्यापिका ॲड.अश्विनी कांबळे शिक्षिका कस्तुरी मायनाळे,ऋतुजा हत्तुरे,मंगला देशमुख,सिद्धार्थ हत्तुरे,संगमेश बाके,संतोष पाटील,गणेश धोकटे, सिद्धाराम कटारे,आकाश देशमुख,जेम्बगी आदी सह पालक व कर्मचारी उपस्थित होते.