यामध्ये काव्य वाचन,व्याख्यान,मुलाखत,पुस्तक परिचय,गीत रामायण,नाटक,बालनाट्य, लेखन,वाचन,हस्ताक्षर कार्यशाळा, चर्चा सत्र आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते या पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उदघाटनापूर्वी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक पर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.
यावेळी नियोजन बैठकीत पद्माकर कुलकर्णी (अध्यक्ष, मसाप जुळे सोलापूर),विजय साळुंखे (अध्यक्ष,अ.भा.मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा),डॉ.शिवाजी शिंदे (सहकुलसचिव,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ), प्रशांत बडवे (कार्याध्यक्ष,मसाप दक्षिण सोलापूर), प्रशांत जोशी (वरिष्ठ उपसंपादक,दैनिक संचार),किरण बनसोडे (अध्यक्ष,महापालिका पत्रकार संघ ) गिरीश दुनाखे (प्रमुख कार्यवाह,मसाप जुळे सोलापूर)प्रा.डॉ.नानासाहेब गव्हाणे प्रा.अमोगसिद्ध चेंडके,कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
