धाराशिव : दि.१८ (एमडी२४न्यूज) राज्यात भ्रष्टाचार विरोधी लढ्यात आणखी एक यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरज शांतीलाल देवकर (वय 35) यांना लाच घेताना धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदारावर तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपी देवकर यांनी सदर प्रकरणात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 1,00,000 रुपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 50,000 रुपये स्वीकारताना आज पंचासमक्ष सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
सापळा कारवाईचे तपशील - लाच मागणी रक्कम: 1,00,000 रुपये,लाच स्वीकारली रक्कम: 50,000 रुपये,सापळा दिनांक: 17 जानेवारी 2025 सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी केले. त्यांना पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, विशाल डोके,शशिकांत हजारे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
