दिल्ली : (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयातून ७०० किलो गांजा बाळगल्या प्रकरणी ३.५ वर्षापासून अटकेत असलेल्या आरोपी आकाश चंद्रकांत राजमाने (रा.चिवरी ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद) यास ७०० किलो गांजा वाहतूक तसेच बाळगल्या प्रकरणत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र कुमार माहेश्वरी व न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठने आरोपीचा जमीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
आरोपी आकाश राजमाने यांच्या विरुद्ध चितलसार (ठाणे) पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा क्रमांक -१५४/२०२० अन्वे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा १९८५ चे कलम ८(क) आणि २० चे अंतर्गत दि.०१/०८/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार एक संशयित ट्रक ६०० ते ७०० किलो गांजा वाहतूक करणार आहे व सदरचा ट्रक येणार असल्याची गुप्त माहिती बातमीदाराकडून प्राप्त झाली होती.
सदर प्रकरणात एकूण ७ आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. आरोपी ट्रक ड्रायव्हर आकाश राजमाने यास दि. ०३/०८/२०२१ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी हा सुमारे ३.५ वर्षांपासून तळोजा येथील तुरुंगात होता. त्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले होते परंतु ते सर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. आरोपींनी त्यानंतर आपला जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे दाखल केला होता. आरोपीचा संबंध सदरच्या खटल्यात अंमली पदार्थ संबंधी कसा होता व तो या सर्व टोळी सोबत कसा जोडला गेलेला आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शासनाचे अधिवक्तांना विचारले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरोपी आकाश चंद्रकांत राजमाने यांचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
प्रस्तुत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.संकेत देशपांडे,ॲड.सुवर्णा गानू यांनी काम पाहिले तसेच शासनाकडून ॲड.ध्रुव शर्मा व ॲड.आदित्य पांडे यांनी काम पाहिले.
