भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिले पोलीस अधीक्षक यांना निवेदन
सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आदिवासी पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत व तसेच सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब हे सुद्धा आदिवासी पारधी समाज यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी,रोजगार उपलब्ध करून देत आहेत व त्यांची महत्त्वकांक्षी पहाट योजना सुद्धा यशस्वी ठरत आहे.
परंतु सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.येथे कार्यरत असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी १) ए.एस.आय.खाजा मुजावर २) नारायण गोलेकर ३) पोलीस हवालदार राहुल दोरकर ४) मोहन मनसावाले सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी त्यांच्या महत्त्वकांक्षी पहाट योजनेला काळीमा फासत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून एकाच ठिकाणीच नेमणुकीस आहेत त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नसल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील पीडित आदिवासी समाजातील रवींद्र राम काळे राहणार बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना कुठलेही कारण नसताना पारधी समाजातीलच सुरेश उर्फ बिगुल्या काळे (गुन्हेगारी वृत्तीचा इसम),सचिन सुरेश काळे राहणार तांमदरडी तालुका मंगळवेढा,समाधान रमेश काळे राहणार अरबळी तालुका मोहोळ,पारूबाई समाधान काळे राहणार अरबळी तालुका मोहोळ,हरिलाल लक्ष्मण काळे राहणार डोणज तालुका मंगळवेढा,शेखर जाफर पवार राहणार सिद्धापूर तालुका मंगळवेढा,उमेश जाफर पवार राहणार सिद्धापूर तालुका मंगळवेढा यांच्या सांगण्यावरून पाठीमागील भांडणाचा रोष मनात धरून वरील पोलिसांना आर्थिक आमीष देऊन विनाकारण खोट्या नाट्या गुन्हात अडकावीत आहेत. तसेच पोलीस हवालदार राहुल दोरकर यांच्या मोबाईल वरून संजय भोसले राहणार मिरी तालुका मोहोळ यांना फोन करून खाजा मुजावर व नारायण गोलेकर हे दोघेही मोठ्या उन्हात अडकवण्याची धमकी व दमदाटी करीत आहेत की इतर पारधी समाजातील गुन्हेगार जे असतील त्यांची माहिती दे नाहीतर तुलाच मोठ्या गुन्ह्यात अडकिवतो अशी धमकी देत आहेत. तसेच विष्णू अनिल भोसले राहणार निवर्गी तालुका इंडी जिल्हा विजापूर या अल्पवयीन मुलास विनाकारण अरबळी तालुका मोहोळ येथील खोट्या गुन्ह्यात अडकिवले आहे.
सदर मुलगा ऊसतोड काम करून आपली उदरनिर्वाह करीत असताना सुद्धा त्याला खोट्या गुन्ह्यात अडकिवले आहे. तसेच इतर पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार मोलमजुरी करणारे गुन्हेगार वृत्तीपासून अलिप्त असलेले तरुणावर सुद्धा खोटे नाठे गुन्हे दाखल करीत आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे कुठलीही शहानिशा न करता रात्री अप रात्री घरात घुसणे,महिलांना अर्वाच्य शिवीगाळ करणे, दमदाटी देणे,असे अनेक प्रकार घडत असून संबंधित पोलीस कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी तसेच गेल्या अनेक वर्षापासून ते एकाच ठिकाणी नेमणुकीस असून त्यांची इतरत्र बदली करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी व वरील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यापासून बाधित इसमास होणाऱ्या मानसिक,शारीरिक,आर्थिक,त्रासापासून सुटका करीत त्यांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना दिले.त्यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधितांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करणार असे ठोस आश्वासन दिले आहे.
सदरचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनाही निवेदन पाठवले आहेत.
