अल्पवयीन पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेतील आरोपीस सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर.
सोलापूर : दि.१४ (एमडी२४न्यूज) एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेतील असलेले संशयित आरोपी कल्पेश भगवान पाटोळे यास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी कल्पेश पाटोळे याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक ४६३/२०२४ अन्वये भादवी कलम ३७६,३७६ (२) (n) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ अंतर्गत दि. २५/०७/२०२४ रोजी दाखल करण्यात आली होती. संशयित आरोपीची पिडीते सोबत तो राहत असलेल्या घराजवळ ओळख झाली होती. तदनंतर आरोपी हा स्वतःहून २०२० पासून पिडीते सोबत बोलत असत. आरोपीची तोंड ओळख असल्याने व तसेच पिडीतेला विश्वासात घेऊन माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करतो अशी हमी आरोपीने पिडीतेला दिली होती.
त्या गोष्टीवर विश्वास ठेवून पिडीता आरोपीच्या खोट्या आश्वासनावर बळी पडून आरोपींने तिच्यावर वारंवार दुष्कर्म केले होते. पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केले होते. त्यानंतर जून २०२४ मध्ये समाजातील वरिष्ठांनी बैठक घेतली होती व त्यात देखील समाज बांधवांनी लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने नकार दिला होता त्यानंतर पिडितेने संबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. अटक झाल्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.सुरज पाटोळे,ॲड.विशाल मस्के,ॲड. स्वाती राठोड,ॲड.दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड. ओंकार फडतरे यांनी काम पाहिले.
